कधी काही कधी काही
कधी कधी सारे काही
कधी कधी काहीच नाही.
कधी दिसे गिरीशिखर दूरचे
तर कधी धुक्यात चाचपडत राही.
कधी आधाराचे हात अनेक
तर कधी एकटाच तोल सावरत जाई.
कधी शोधता मिळे घबाड
कधी हाती काहीच नाही.
असाच चालत असताना
कधीतरी स्वतःच संपून जाई.
कधी काही कधी काही
कधी कधी सारे काही
कधी कधी काहीच नाही.
~
Waa...khup chan vidamban ahe!
ReplyDeleteSunder lihites tu...
Shevatchya oli khup kahi bolun gelya :)
dhanyavaad!
ReplyDeleteExquisite write. Nice Mag. Love and Light, Sender
ReplyDelete