Join the gang!

Thursday

देव - marathi poem

कधी कधी
दुसरं कुणीच
बोलायला नसतं
मग आपण
देवाशी बोलतो.
एरवी देव
मानत नाही.
तसंही आपण
माणसात देव
नाही, तर
देवात माणूस,
एखादं
आपलंसं माणूस
शोधत असतो.
~ अलका, २०१७

No comments:

Post a Comment